उपरी येथे बिरसा मुंडा यांची 148 वि जयंती साजरी ; झेंडा फडकवून क्रांति वीरांना केले अभिवादन.

उपरी येथे बिरसा मुंडा यांची 148 वि जयंती साजरी ; झेंडा फडकवून क्रांति वीरांना केले अभिवादन.


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील उपरी येथे भगवान बिरसा मुंडा यांची 148 वी जयंती उत्सव उपरी येथील आदिवासी समाज बांधवा तर्फे मोठ्या हर्षउलसाने करण्यात आला.बिरसा मुंडा हे देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या प्राना चे बलिदान दिली मावा माटे मावा राज म्हणत बीरसा मुंडा यांनी ब्रिटिशांना सडोकी पडू केलं आदिवासी होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात अनेक बंडा पुकारून उल गुलान  केला देशाला लाभलेल्या कार्याला येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरावा.


 आणि बिरसा मुंडा चे विचार  येणारे भविष्य काळातील युवकांना इतिहास मनामनात राहावे. बिरसा मुंडा चे बलिदानाची ज्योत सदोदित पेटत राहावी करिता संपूर्ण देशभरात आदिवासी बांधवंतर्फे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात येतो. बिरसा मुंडा चे बलिदान देशाच्या स्वातंत्र्यासाठी खूप मोलाचे असून आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना भगवान मानतो.दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उपरी गावांमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती फार  हर्षउलासाने साजरी करण्यात आली.


भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे उद्घाटक कुमुद सातपुते सरपंच ग्रामपंचायत उपरी. कार्यक्रमाचे सह उद्घाटक किशोर भाऊ वाकुडकर सामाजिक कार्यकर्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष योगिता ताई बगडे शिक्षिका चंद्रपूर, कार्यक्रमाचे सहअध्यक्ष आशिष मन बत्तुलवार उपसरपंच उपरी, या जयंती महोत्सवाचे मुख्य मार्गदर्शक सावली तालुका अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली,प्रवीण भाऊ गेडाम.आदिवासी समाज अध्यक्ष शंकर तलांडे,पोलीस पाटील पांडुरंग शेटे,ज्ञानेश्वर सिडा म, अमोल कांबळे,गुड्डू चिकराम,अंबादास सुरपामविलास तलांडे,ईश्वर चिक राम,निंबाजी आहे अलोणे,दादाजी येणप्रेडीवार,वासुदेव सातपुते ,दिलखुस सातपुते,विजय अलोणे वासुदेव बोलीवार ,बाबुराव गेडाम,कुंताबाई गेडाम,आदी मंचावर उपस्थित होते.


भगवान बिरसा मुंडा चे जीवन चरित्र आणि त्यांचे बलिदान समाज बांधवांना प्रवीण गेडाम यांनी आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले.मुलींनी शिक्षणासोबत राणी दुर्गावती प्रमाणे लढवय्या व्हावे सावित्रीच्या लेकींनी शिक्षण अंगी करावी असे अध्यक्ष भाषणातून योगिता भडके यांनी सांगितले.


भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव निमित्याने आदिवासी कला संस्कृती व पारंपारिक वेशभूषांनी गावातून रॅली काढण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण व मानवंदना देत क्रांतिवीरणा अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा  यांच्या नाऱ्याने  वातावरण दुमदुमले या जयंतीला  महिला पुरुषांची मोठी संखेने उपस्थिती होती या कार्यक्रमात प्रसंगी  आदिवासी युवतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे माध्यमातून आपले आदिवासी कला संस्कृती चे दर्शन दाखविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण मडावी तर आभार करन गेडाम यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !