विद्यापीठ स्तरीय मैदानी स्पर्धत समर्थ महाविद्यालयाला मिळाले घवघवीत यश ; विद्यापीठ मैदानी स्पर्धेत 11 पदक
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित समर्थ महाविद्यालयात लाखनी येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत 11 पदक प्राप्त करून दणदणीत विजय मिळविला.यामध्ये समीर देशमुख साखळी गोळा फेक मध्ये सुवर्णपदक, स्वाती उईके लांब उडी मध्ये सुवर्णपदक आणि 400 मीटर मध्ये रौप्य पदक, सायली उईके,तिहेरी उडी मध्ये सुवर्णपदक आणि लांब उडी मध्ये कास्यपदक, श्रेयस लांजेवार, लांब उडी स्पर्धेत रौप्य पदक, चंद्रहास खंडारे, 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत कास्यपदक, तर मिक्स रिले मध्ये 4 कास्यपदक मिळवून खेळाडूंनी यश संपादन केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. क्रीडा विभाग प्रमुख प्रा.धनंजय गिरीपुंजे यांनी या खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी केलेल्या यशबद्दल विद्यापीठ आणि जिल्हा क्रीडा जगताकडून अभिनंदन केले जात आहे.