राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर जेरबंद ★ एकूण 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.


राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर जेरबंद


★  एकूण 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास


वरोरा : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी केलेल्या कारवाईत वरोऱ्यातील बनावट मद्य तस्कर आरोपी अनिलसिंग अजबसिंग जुनी उर्फ पिंटू सरदार व आशिष पुरुषोत्तम मडावी यांना जेरबंद करण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागास यश आले. गुप्त माहितीच्या आधारे दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटेच्या वेळी आनंदवन चौक वरोरा येथे सदर आरोपींना वाहनासह ताब्यात घेण्यात आले.


आरोपीच्या ताब्यातून 90 मिलीच्या 600 देशी मद्याच्या बनावट बाटल्या असा एकूण 1 लक्ष 16 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे वरोरा तालुक्यातील बनावट देशी मद्य विक्री करणारा मुख्य सूत्रधार पकडला गेला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले. आरोपीस पुढील तपासासाठी तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


सदर कारवाई नागपूर,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त अनिल चासकर,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात वरोराचे निरीक्षक विकास थोरात,सचिन पोलेवार,दुय्यम निरिक्षक भगीरथ कुडमेथे,सहाय्यक दुय्यम निरीक्षक जगदीश मस्के,जवान-नि-वाहन चालक विलास महाकुलकर यांनी पार पाडली.सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत असे राज्य उत्पादन शुल्क वरोरा चे निरीक्षक विकास थोरात यांनी कळविले आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !