मुल येथे विद्यार्थ्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा ,पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम समारोपीय सोहळ्यात मान्यवरांचा सूर.

मुल येथे विद्यार्थ्यांनी संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा ,पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम समारोपीय सोहळ्यात मान्यवरांचा सूर.


एस.के.24 तास


मुल : इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा ऑनलाइन वृत्तपत्रांचा राहणार आहे. त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवित विद्यार्थ्यांनी सजग व्हावे,अशी भावना कर्मविर महाविद्यालय मुल च्या वतीने आयोजित पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम समारोपीय सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली.


         अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या या व्यवस्थेत आजची पत्रकारिता ही जलद आणि गतिमान झाली आहे. सोशल मीडियानेही जग पादाक्रांत केले आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा आँनलाईन वृत्तपत्रांचा राहणार आहे.त्यामुळे येणारी नवी आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मिळवित विद्यार्थ्यांनी सजग व्हावे, अशी भावना  कर्मविर महाविद्यालय मुल च्या वतीने आयोजित पत्रकारिता समारोपीय सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केली. 


कर्मविर महाविद्यालय मूलच्या वतीने आयोजित पत्रकारिता समारोपीय सोहळ्यात कर्मविर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली,प्रमूख अतिथी मुख्याधिकारी यशवंत पवार,संपादक दीपक देशपांडे,विजय सिध्दावार,अमित राऊत,देशोन्नती प्रतिनिधी :गुरूभाऊ गुरूनुले,प्रमोद मशाखेत्री,महिला पत्रकार कुमुदिनी भोयर,आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.


महाविद्यालयीन कर्मचारी वृंद तसेच प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थीनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.समाजाच्या प्रत्येक घटकाच्या समस्यांना पत्रकार वाचा फोडतो ; मात्र स्वत:च्या व्यथा मांडू शकत नाही. चतुरस्र असलेल्या पत्रकारांचा बहुमान होणे कौतुकास्पद बाब असून, समाजासाठी एक आरसा म्हणून असे उपक्रम घेतले पाहिजे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !