राष्ट्रवादी काँग्रेस सावली तालुका अध्यक्ष पदी,घनश्याम राऊत यांची नियुक्ती.
एस.के.24 तास
सावली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सावली तालुका अध्यक्ष पदावर मोखाळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते घनश्याम यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली .
महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट वेगळे झाल्याने पूर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट तयार झाले . नुकतेच चंद्रपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सावली तालुका अध्यक्ष पदावर मोखाळा गावचे रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने कार्यकर्ते घनश्याम राऊत यांची नियुक्ती करण्यात आली . पक्षाचे राष्ट्रीय सचिव आमदार,राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर तथा चंद्रपूर शहर अध्यक्ष,राजीव कक्कड उपस्थित होते.