सिंदेवाही तालुक्यात हत्ती मृतावस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.



सिंदेवाही तालुक्यात हत्ती मृतावस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.


एस.के.24 तास


चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून सिंदेवाही तालुक्यात हत्तीने धुमाकूळ घातला असताना मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी सकाळी एक हत्ती मृतावस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.


हत्तीने या भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन हत्तीचा मृत्यू तर झाला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.आसाम येथील हत्ती छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले.येथून हे हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली,सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यात धुमाकूळ घालत आहे. 


रात्री बेरात्री कधी दिवसा हत्तीचा कळप शेतात प्रवेश करून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.


मंगळवार ३ आक्टोंबर रोजी सकाळी सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र तांबेगडी मेंढा येथील नियत क्षेत्र मुरपार बीटा मधील एका खाजगी शेतात मृता अवस्थेत जंगली हत्ती आढळून आला आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्राचे विभागाचे अधिकारी वन विभागाचे चमु तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


वर्षभरापूर्वी हत्तीचा कळप चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता,वनविभाग त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता.मात्र एक हत्ती मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे.दरम्यान शेतकरी शेतात कुंपणाला जिवंत वीज प्रवाह सोडतात.या वीज प्रवाहाचा स्पर्श होऊन तर हत्ती दगावला नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !