उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंच्या हस्ते निंबाळ्यात ३ हातपंपाचे लोकार्पण ; अंगणवाडी दुरुस्ती कामाचेही उद्घाटन.

उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंच्या हस्ते निंबाळ्यात ३ हातपंपाचे लोकार्पण ; अंगणवाडी दुरुस्ती कामाचेही उद्घाटन. 


राजेंद्र वाढई - उपसंपादक


राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत अंतर्गत मौजा निंबाळा येथे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते अंगणवाडी दुरुस्ती कामाचे उद्घाटन व  पिण्याच्या पाण्यासाठी गावात ३ हातपंपाचे लोकार्पण कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, मौजा निंबाळा येथे जिल्हा परिषद चंद्रपूर येथील महिला बालकल्याण विभागाकडे पाठपुरावा करून अंगणवाडी दुरुस्तीस मंजुरी मिळविली.

आणि अखेर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे अंगणवाडी येणाऱ्या बालगोपालावर सुसंस्कार होऊन सुजन नागरिक तयार होण्यास मदत होईल त्याचे मला समाधान आहे. तसेच निंबाळा येथे पिण्याच्या पाण्याची खुप मोठी समस्या होती. त्याकरिता जिल्हा परिषद चंद्रपूर येथे पाठपुरावा करून येथे ३ हातपंप मंजुर करुन घेतले त्या मुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली त्यामुळे आता ही समस्या देखील सुटलेली आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक सर्व प्रामाणिक प्रयत्न मी करीत राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 


या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, ह भ प रामदास महाराज भोयर, जेष्ठ नागरिक महादेव पाटील मेश्राम, पोलीस पाटील गोपाल पाल, ग्रामसेवक मरापे, भिवसन मोटघरे, नामदेव देवाळकर, दौलत मोटघरे, रावजी गौरकार, निलकंठ मोटघरे, मधुकर पेदोंर, शंकर मेश्राम,निलकंठ घाटे,मुरलीधर पेंदोर,राजेश देवाळकर, अमोल उरकुडे, श्रावण गेडाम,श्रावण बोरकर,प्रशांत पेंदोर, विठ्ठल देवाळकर,शिपाई सुनील मेश्राम,विशाल नागोसे, यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !