बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा... गडचिरोली जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने भटक्या जमाती (क) प्रवर्गात बोगस झाडे जातीची घुसखोरी थांबविण्यासाठी. ★ दिनांक १० ऑक्टोबर २०२३ दुपारी १२.०० वाजता पासुन गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गडचिरोली. ★ जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील अन्यायग्रस्त उमेदवारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

गडचिरोली जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देताना शिष्टमंडळ


बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा...


गडचिरोली जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने भटक्या जमाती (क) प्रवर्गात बोगस झाडे जातीची घुसखोरी थांबविण्यासाठी.


दिनांक १० ऑक्टोबर २०२३ दुपारी १२.०० वाजता पासुन गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गडचिरोली.


जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील अन्यायग्रस्त उमेदवारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : गडचिरोली जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने भटक्या जमाती (क) प्रवर्गात बोगस झाडे जातीची घुसखोरी थांबविण्यासाठी.दिनांक १० ऑक्टोबर २०२३ दुपारी १२.०० वाजता पासुन गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गडचिरोली.जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेतील अन्यायग्रस्त उमेदवारांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

गडचिरोली जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने कोटगल येथे अन्यायग्रस्त उमेदवारांनसोबत मिटींग घेताना शिष्टमंडळ 


 गडचिरोली जिल्ह्यात धनगर जातीतील झाडे या पोटजातीचा नामसदृष्याचा गैरफायदा घेत झाडे कुणबी जातीतील लोक भटक्या जमाती (क) प्रवर्गात  घुसखोरी करीत आहेत.


२०२१ मधील गडचिरोली पोलीस भरती प्रक्रियेत ३ बोगस झाडे कुणबी उमेदवारांची नियुक्ती झाली आहे. परंतू वर्षभराचा कालावधी लोटला तरी उमेदवारांनी जात  पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलीडीटी सर्टीफीकेट) सादर केलेले नसतांना सुध्दा सदर उमेदवारांना बडतर्फ करण्यात आलेले नाही. 


२०२२ मधील गडचिरोली पोलीस भरती प्रक्रियेत १० बोगस झाडे उमेदवारांची निवड झालेली आहे. त्यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र अवैद्य झालेले असताना सुध्दा त्या उमेदवारांची निवड रद्द केलेली नाही. 


२०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बल क्र. १८ काटोल (नागपूर ) भरती मध्ये ५ बोगस झाडे जातीच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.नियुक्त उमेदवार बोगस असल्याचे आक्षेप घेतल्यानंतरही त्यांची नियुक्ती स्थायी करण्यात आलेली आहे. त्यामुळे भटक्या जमाती (क) प्रवर्गातील खऱ्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.


वरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गडचिरोली पोलीस विभाग,गडचिरोली जिल्हा जात पडताळणी समिती व राज्य राखीव पोलीस बल विरोधात खालील मागण्या घेऊन गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीतील  अन्यायग्रस्त उमेदवार बेमुदत उपोषण आंदोलन करीत आहेत.


उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या : -


१) गडचिरोली पोलीस भरती प्रक्रिया २०२१ मध्ये भटक्या जमाती (क) प्रवर्गाकरिता राखीव असलेल्या जागेवर नियुक्त करण्यात आलेल्या बोगस झाडे उमेदवारांनी सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्या उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे. 


 २) गडचिरोली पोलीस भरती प्रक्रिया २०२२ मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे. अशा उमेदवारांवर गुन्हे दाखल करून त्यांची निवड रद्द करण्यात यावी. 


३) भटक्या जमाती (क) मधील बोगस झाडे उमेदवारांचे जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र वैद्य / अवैद्य ठरवावे.


४) गडचिरोली पोलीस भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादीत असलेल्या खऱ्या भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवारांना त्वरित नियुक्ती आदेश देण्यात यावे. 


५) राज्य राखीव पोलीस बल भरती काटोल (नागपूर) मधील बोगस झाडे उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे.


वरील प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन सुरूच राहील म्हणून अन्यायाच्या विरोधात आवाज अधिक तीव्र करण्यासाठी गडचिरोली/ चंद्रपूर व इतर जिह्यातील धनगर समाजातील बांधव, भगिनी,युवक,युवतींनी जास्तीत जास्त  संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन,धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा गडचिरोली व अन्यायग्रस्त उमेदवरांकडून करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !