आरमोरी (काळागोटा) येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार.

आरमोरी (काळागोटा) येथील महिला वाघाच्या हल्ल्यात  ठार.


एस.के.24 तास


आरमोरी  : आरमोरी तालुक्यातील रामाळा येथील शेतशिवारात खरीप हंगामातील हलक्या धानांची धान कापणी करीत असताना एका मजूर महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज १९ आक्टोंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. ताराबाई एकनाथ घोडरे मु.ता.आरमोरी (काळागोटा) असे व्याघ्र बळी ठरलेल्या मजूर महिलेचे नाव आहे.


माहितीनुसार, सद्यस्थितीत खरीपातील हलक्या धानांच्या कापणीचा हंगाम सुरु झाला आहे. आरमोरी तालुक्यातील रामाळा येथील शेतशिवारात आरमोरीच्या काळागोटा परिसरातील सात-आठ महिला मजूर धान कापणी करीत होत्या. अशातच धान कापणी सुरु असतानाच अचानक वाघाने महिला मजुरावर जोरदार झडप घातली. झडप घातल्यानंतर काही अंतरावर वाघाने सदर महिलेला फरफटत नेले. त्यावेळी भेदरलेल्या अवस्थेतील सर्व महिलांनी जोरजोरात आरडाओरडा केला. त्यावेळी आजूबाजूच्या शेतशिवारातील लोकही धावून आले. त्यामूळे वाघ जंगलात निघून गेला.मात्र महिलेच्या नरडीचा घोट घेतल्यामुळे सदर महिला गतप्राण झाली.

सदर घटनेची माहिती वनविभागाला उपस्थितांनी दिली.असून सदर नरक्षक वाघाचा तत्काळ वनविभागाने बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !