अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,२८/१०/२३ " धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस मानसिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे.जे संविधान समग्र अशी मूल्यव्यवस्था देते ,हे संविधान बनविल्यानंतर १४ ऑक्टो.१९५६ ला धम्मक्रांतीचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला,कारण धम्म माणसाला सामूहिक आनंदाचा मार्ग दाखवितो. बाबासाहेबांनी यासाठी आयुष्यभर कसरत केली. ' सर्व मानव जातीचा कल्याण ' हा बाबासाहेबांच्या लढयाचा गाभा होता.आता संविधान वाचविण्यासाठी माणसं एका तंबूत यायला हवे.
बुध्दधम्म स्वतःला प्रश्न विचारायला लावतो.येणारा युग हा कुत्रिम बुध्दीमत्तेचा आहे, त्यामुळे भारतीय समूहाचा सामूहिक सद् सद् विवेक जागृत राहिल तेव्हा संविधानाची मूल्ये रुजतिल.संविधानाला अनुकुल अशी मनाची मशागत करावी लागेल,कारण संविधान क्रांतीकारक आहे पण समाजमन त्याच्या पाठिशी भक्कमपणे उभे हवे." असे बहूमोल मार्गदर्शन सामाजिक कृतज्ञता निधी ,एस एम जोशी फाऊंडेशन,पुणेचे कार्यवाह सुभाष वारेंनी केले.
ते ब्रह्मपुरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विचारपिठावर अध्यक्षस्थानी मुंबईचे प्रोफेसर राम पुनियानी होते तर उपस्थितीत कवी प्रभू राजगडकर ,विलास भोंगाडे,समिती अध्यक्ष अशोक रामटेके, उपाध्यक्ष आसाराम बोदेले,सचिव डॉ युवराज मेश्राम, सहसचिव डॉ ई.एल.रामटेके,कोषाध्यक्ष भीमराव बनकर,संघटक नेताजी मेश्राम,
महिला संघटक अँड नंदा फुले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.दीपप्रज्वलन व बुध्दवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर पाहूण्यांच्या हस्ते दहावी,बारावीत सर्वोच्च गुणांकनाने उत्तीर्ण होणारे मानसी सु.ठाकरे,केशवी प्र.राऊत, रोहित व.दौडा,आर्या हे.भावे,ऋतुजा शं.कामडी यांचा सत्कार करण्यात आला.आपल्या अध्यक्षिय भाषणात प्रोफेसर राम पुनियानी म्हणाले की,समाजपरिवर्तनासाठी असे कार्यक्रम आवश्यक आहेत.
समाजात परिवर्तन व आनंदासाठी बाबासाहेब झिजले.त्यांनी आपले गौतम बुद्ध,संत कबिर व म.जोतिराव फुले असे तीन गुरु मानले.बुध्द धम्म ही भारतीय क्रांती होती.या देशात भगतसिंग स्वातंत्र्यासाठी,बाबासाहेब समतेसाठी आणि म.गांधी बंधूतेसाठी सर्वात पुढे होते,याचा समागम संविधानात मिळतो.असे अध्यक्षीय विवेचन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय समिती अध्यक्ष अशोक रामटेकेंनी करुन आपली भूमिका मांडली.संचालन समिती सचिव डॉ युवराज मेश्रामांनी तर आभार समिती सदस्य जगदिश मेश्रामांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ डी एच गहाणे,अँड गोविंदराव भेंडारकर,डॉ खिजेंद्र गेडाम, डॉ धनराज खानोरकर,डॉ माधुरी कोकोडे,चंद्रशेखर बांबोळे,इजि.विजय मेश्राम,सरिता खोब्रागडे, प्राचार्य डॉ आर.बी.मेश्राम अशी अनेक मान्यवर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी सुधीर अलोणे,बौध्दरक्षक जांभुळकर,नरेंद्र बांते,डॉ मिलिंद पठाडे आणि समिती सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.