काँग्रेस ची विभागीय बैठक संपन्न ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या सह प्रमुख नेत्यांची उपस्थिती.
★ जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सादर केला जिल्हा काँग्रेसच्या कार्याचा लेखाजोखा.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. आमदार नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनुसार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींची माहिती जाणून घेण्याकरीता व आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणूकाच्या पूर्वतयारी करीता नागपुर येथे विभाग जिल्हानिहाय आढ़ावा बैठक दि. 12/10/2023, रोजी नागपूर येथील महाकालकेशकरं सभागृहात पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारजी, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटीलजी, माजी मंत्री डॉ. नितीनजी राऊत,माजी मंत्री मा. सुनील जी केदार,
आमदार अभिजित वंजारी,महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे,काँग्रेस नेते माजी खासदार मारोतराव कोवासे, राज्य प्रवक्ते अतुल लोंढे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम,माजी आमदार पेंटारामजी तलांडी,प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि. प. उपध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सचिव डॉ. चंदा कोडवते,युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, महिला अध्यक्ष कविता मोहरकरं, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,रोजगार सेल
अध्यक्ष दामदेव मंडलवार,युवक काँग्रेस अध्यक्ष लोरन्स गेडाम, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर,ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते,शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे,आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी प्रमोद भगत, गडचिरोली वसंत राऊत, वडसा राजेंद्र बुल्ले,कोरची मनोज अग्रवाल, एटापल्ली रमेश गंपावार,धानोरा परसराम पदा मुलचेरा प्रमोद गोटेवार,सिरोंचा सतीश जवाजी सह जिल्ह्यातील काँग्रेस नेते,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमीटी आणि सर्व फ्रंटल चे पदाधिकारी, या बैठकीत उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी जिल्हा काँग्रेस च्या संघटनात्मक बाबींची व इतर उपक्रमाची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली.