विद्यार्थी आई-वडिलाना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करावा.

विद्यार्थी आई-वडिलाना व्यसनमुक्त करण्याचा संकल्प करावा.


एस.के.24 तास


चंद्रपूर : मौजा तुकुम(तिवली) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य, जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, जिल्हा चंद्रपूर च्या वतीने आयोजित व्यसनमुक्ती सप्ताह राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत जि.प.उच्च प्राथमिक शाळा,तुकूम ति.येथे आयोजित कार्यक्रमात मा.विकास नन्नवरे, शिक्षक याचे अध्यक्षतेखाली समाजातील बहुतेक पालक वर्ग तंबाखू,खरा, गुटखा, दारुच्या व्यसना मध्ये अडकलेला आहे.यावर एकमेव उपाय म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानी आपल्या पालकांना व्यसनमुक्तीचा आग्रह धरावा.आई-वडिलानी पान टपरीवर खरा आणायला सांगितल्यावर स्पष्ट नकार द्यावा.तरच व्यसनमुक्ती सप्ताहाचे फलित होईल असे परखड मत व्यक्त केले.


या कार्यक्रमाला मार्गदर्शक जिल्हा संघटक संदिप कटकुरवार यांनी व्यसनमुक्तीपर पोस्टर प्रदर्शनी द्वारे विद्यार्थ्यांना महामानवाच्या व्यसनमुक्तपर विचारांचा प्रचार,प्रसार करावा.व्यसनी कुटुंबासी सुसंवाद साधावा.व मतपरिवर्तनातून व्यसनमुक्ती साध्य आहे.असे विचार मांडले.


या वेळी विद्यार्थ्यांना सामुहिक व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली.कार्यक्रमाला शिक्षक वृंद सह विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !