भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे शहीद वीर जवान,सतीश कसनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ नोटबुक आणि पेनचे वितरण.

भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे शहीद वीर जवान,सतीश कसनवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ नोटबुक आणि पेनचे वितरण.

         

एस.के.24 तास

       

गडचिरोली : गडचिरोली च्या गोकुलनगर परिसरातील रहिवासी आदरणीय गणपतजी कसनवार यांचा मुलगा शहीद वीर जवान सतीश कसनवार हे देशसेवेसाठी कर्तव्यावर असतांनाच दि.१६ आक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नक्षल्यांच्या भ्याड हल्यात शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ कसनवार परिवार आणि मित्रपरिवार यांच्या वतीने शहीद दिनी भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे नोटबुक आणि पेनचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान.एस.एम.खांडरे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून मान.अमोलजी कसनवार आणि कसनवार परिवारातील सदस्य उपस्थित होते.यावेळी मान.चेतन ठाकरे सर यांनी शहीद वीर जवान सतीश कसनवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कोरडे मॅडम यांनी केले.


तर आभार प्रदर्शन कु.डहाके मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री.पाचभाई सर,श्री.बाला सर,श्री.खुणे सर,श्री.लेणगुरे सर,श्री.शेख सर कु.मोरे मॅडम यांनी सहकार्य केले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. खाऊचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !