भालेश्वर येथील अलोने कुटुंबीयांची शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख यांनी घेतली सांत्वनपर भेट.

भालेश्वर येथील अलोने कुटुंबीयांची शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख यांनी घेतली सांत्वनपर भेट.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


 ब्रम्हपुरी : १२/१०/२३ भालेश्वर येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जुने शिवसैनिक विभाग प्रमुख, माजी सरपंच तथा विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष मोरेश्वर अलोने यांचे ब्रेन स्ट्रोक ने अचानक नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे निधन झाले.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन त्यांची ओळख होती. 


सोबतच त्यांची पत्नी उर्मिला अलोने ह्या सुद्धा माजी सरपंच असून शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटीका म्हणून पक्षात कार्यरत आहेत.मोरेश्वर अलोने यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने दिनांक ०८ ऑक्टोंबर २०२३ ला त्यांच्यावर नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार होती, पण तत्पूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने शिवसेना पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता हरपला. 


सदरचे वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेशजी केदारी व अहेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रियाज भाई शेख यांना मिळताच त्यांनी अलोने कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. 


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हा प्रमुख प्रा.अमृत नखाते,केवळराम पारधी तालुका प्रमुख,कुंदा कमाने तालुका संघटिका,शहर संघाटिका ललिता कांबळे, राखी बनाईत,माजी शहर प्रमुख शामराव भानारकर, डॉ.रामेश्वर राखडे  उपतालुका प्रमुख, संजय ढोरे,मुन्ना टेंभूरकर, गणेश बागडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !