वडसा देसाईगंज येथे झाडीपट्टी लेखक संघटनेची स्थापना. ★ अध्यक्ष युवराज गोंगले,उपाध्यक्ष संजय ठवरे,सचिव प्रा. संतोष बारसागडे

वडसा देसाईगंज येथे झाडीपट्टी लेखक संघटनेची स्थापना.


अध्यक्ष युवराज गोंगले,उपाध्यक्ष संजय ठवरे,सचिव प्रा. संतोष बारसागडे


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास


वडसा : झाडीपट्टी नाट्यलेखक संघटनेची स्थापना करण्यासाठी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता पटेल लॉन वडसा देसाईगंज येथे जेष्ट नाट्यलेखक रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबईचे सदस्य प्राचार्य सदानंद बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाडीपट्टी नाट्यलेखकांची सभा पार पडली.सभेत झाडीपट्टी लेखकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात येऊन लेखकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने झाडीपट्टी लेखक संघटनेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.


झाडीपट्टी लेखक संघटनेच्या अध्यक्षपदी,युवराज गोंगले,  उपाध्यक्षपदी संजय ठवरे, सचिवपदी प्रा.संतोष बारसागडे,सहसचिव धनंजय मेश्राम,कोषाध्यक्षपदी धनंजय ढवळे,सदस्य म्हणून पुंडलिक भांडेकर,संजय बघेल, किशोर भाग्यवंत, चंदू नैताम, आदेश खेडीकर,तेजाब खिलोटे,शिल्पा पाटील,ओमकार शेंडे,संचित खोब्रागडे,शैलेंद्र बोरकर,कुलदीप कानेंकर,श्रीकांत तुमसरे यांचा समावेश आहे.समन्वयक म्हणून परमानंद गहाणे,प्रसिद्धी प्रमुख आनंद भीमटे यांची निवड करण्यात आली आहे.

तर मुख्य सल्लगार म्हणून सदानंद बोरकर, व्हीं.दिलीपकुमार, सिद्धार्थ गोवर्धन,,रमेश बोरकर,यश निकोडे,रमेश आळे यांची निवड करण्यात आली आहे.लेखक संघटना लेखकांच्या व झाडीपट्टी रंगभूमीच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील असा निर्धार उपस्थित सर्व लेखकांनी केला.


लेखक संघटना काळाची गरज. - प्राचार्य सदानंद बोरकर

नाट्यलेखक आपल्या लेखणीच्या माध्यमातून नाटकाची रचना करून नाटकाला आकार देत असतो म्हणून नाट्यलेखकास नाटककार असेही संबोधले जाते. नाट्यमंडळ,निर्माते,दिग्दर्शक,कलावंत यांची भिस्त सर्वप्रथम नाट्यलेखकावर असते.त्यामुळे नाट्यलेखकास प्रथम प्राधान्य देणे तेवढेच आहे.नाट्यलेखकांच्या सामूहिक अथवा वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व त्यांच्यातील उणिवा दूर करण्यासाठी नाट्यलेखक संघटना उभी करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जेष्ट नाट्यलेखक निर्माते व मुंबई रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य सदानंद बोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन केले.


नाट्यलेखकांनी वैश्विक स्वरूपाचे लेखन करावे, झाडीपट्टीच्या चौकटीत अडकून न राहता आशयघन लेखन करावे,विनोदात अश्लीलता नसावी तर त्याचा दर्जा असावा.रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा सदस्य या नात्याने पुढील तीन वर्षे नाट्य सहितांच्या बाबतीत सदैव मी सहकार्याच्या भूमिकेत असेल अशी हमी जेष्ट लेखक व मुंबई रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य सदानंद बोरकर यांनी दिली. 


लेखक,व्ही.दिलीपकुमार,लेखक सिद्धर्थ गोवर्धन,लेखक आनंद भीमटे,लेखक संजय ठवरे  व उपस्थित अन्य लेखकांनी मनोगत व्यक्त करून झाडीपट्टी नाट्यलेखकांच्या विविध समस्यावर प्रकाश टाकला.


बैठकीला रमेश बोरकर,प्रल्हाद मेश्राम,तेजाब खिलोटे, पुंडलिक भांडेकर,संचित खोब्रागडे,मनोज खांडेकर, गिरीधारी अरसोडे,संजयसिंग बघेल,वसंत चौधरी, बाबुलाल नंदेश्वर,मुकेश गुरनुले,रमेश आळे,ईश्वर धकाते, दिपक बोरकर आदी लेखक मंडळींनी उपस्थिती दर्शवली हाती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !