कवयित्री,लेखिका सोनाली रायपुरे सहारे यांनी केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प.


कवयित्री,लेखिका सोनाली रायपुरे सहारे यांनी केला मरणोत्तर देहदानाचा संकल्प.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रह्मपुरी : दिनांक,०७/१०/२३ तथागत भगवान बुद्धाच्या विचाराने प्रेरित होऊन वर्षावास निमित्ताने कवयित्री,लेखिका सोनाली रायपुरे-सहारे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला आहे.


त्या साहित्य क्षेत्रात  सतत कार्यरत असतात : - 


गडचिरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील तसेच बौद्ध धम्माचे गाळे अभ्यासक व सक्रिय समाज कार्यकर्ते डॉ.एम.ए.रायपुरे, गडचिरोली यांची मुलगी असुन  सोनाली यांचे आता पर्यंत चार पुस्तके प्रकाशित झाले आहेत .त्या आपल्या साहित्यातून सतत समाज प्रबोधन करीत असतात. 


तथागत भगवान बुद्धाच्या विचारातून प्रेरित होऊन, अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सर्वांना दुःखातून मुक्त करण्याकरिता ज्या दहा पारमिता दिल्या त्यातीलच "दान "ह्या  पारमिता मधून प्रेरणा घेवून ५/१०/२३ गुरूवार ला वर्षावास निमित्ताने त्यांनी हा संकल्प केला.  


गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी रोड वरील येवली हे त्यांचे जन्मगाव : -


 दानाचे महत्त्व कळावे व मरणोत्तर आपल्या अवयवामुळे आपल्या समाजाला फायदा होईल व त्यातून प्रदूषण देखील टाळता येईल.देहदान केल्यामुळे शरीराचे महत्त्वाचेअवयव गरजू व्यक्तींना उपयोगी पडून त्यांना जीवनदान मिळावे ही मनस्वी इच्छा बाळगून  हा दूरदृष्टी कोण ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला.देह दानाचा सुज्ञ निर्णय सोनाली रायपुरे / सहारे यांनी घेतल्यामुळे त्यांचे कुटुंब,नातेवाईक,जिवलग मैत्रिणी  यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


देह दानाचा संकल्प त्यांनी घेतला त्यावेळी ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कामठी सर, डॉक्टर नागमोती सर,डॉक्टर सुखदेवे मॅडम,अंजिरा अंबिलदूके NCD समुपदेशक उपस्थित होते. त्यांनी घेतलेले या  निर्णययामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून इतरांनाही प्रेरणादायी " अवयव दान " ठरावा अशी प्रेरणा सर्वांनी घ्यावी व अवयवदान करावा असे त्यांनी अवयव दान करताना आपले मत मांडले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !