बोरचांदली ते मुल मार्गावर चारचाकी वाहन पलटुन झालेल्या अपघात वाहन चालक जागीच ठार झाला : एक जण जखमी.
एस.के.24 तास
मुल : बोरचांदली वरुन मुल कडे येत असलेल्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण गेल्याने चारचाकी वाहन पलटुन झालेल्या अपघात वाहन चालक जागीच ठार झाला.
तर एक जण जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 2.30 वा.दरम्यान घडली.राजकुमार अनिल शायरी वय,23 वर्षे रा.शिरपूर जि.आसिफाबाद असे मृत्तकाचे नाव आहे.तर महेश कंडलवार रा.शिरपूर असे जखमीचे नांव आहे.
पोलीस सुत्राकडुन मिळालेल्या माहितीवरून आसिफाबाद जिल्हयातील शिरपूर येथील महेश कंडलवार आणि राजकुमार अनिल शायरी हे दोघे रविवारी दुपारी 2.30 वा. दरम्यान बोरचांदली वरुन चार चाकी वाहन क्रं.AP 16 AX 2297 ने मूल कडे येत होते.
दरम्यान बोरचांदली पुलाजवळ वाहन चालक राजकुमार अनिल शायरी वय, 23 वर्षे याचे वाहनावरुन नियंत्रण गेल्याने पुलाच्या पिल्लरला वाहनाची जोरदार धडक बसली.आणि चारचाकी वाहन पलटी झाली.या झालेल्या अपघातात वाहनचाकी राजकुमार अनिल शायरी हा जागीच ठार झाला तर महेश कंडलवार हा किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल होवुन जखमीला उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पुढील तपास मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सुमित परतेकी आणि सहा. पोलीस निरीक्षक बन्सोडे यांच्या मार्गदर्शखाली खाली सुरु आहे.आरोपींवर कलम 279, 337, 304 (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.