पत्रकाराला अश्लील शिविगाळ ;अजीत सुकारे वर गुन्हा दाखल.
★ राज्य पत्रकार संघाने दिले होते निवेदन.
एस.के.24 तास
नागभीड : तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथिल एका दैनिकाचे वार्ताहर यांना "तु माझे विरोधात बातमी प्रकाशित केली " म्हणून व्हाट्सअप या समाज माध्यमातुन अश्लिल शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याने अजीत सुकारे यांचेवर तळोधी पोलीस स्टेशन मध्ये अखेर भा.द.वी.कलम 294,501,506, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोधी पोलीस स्टेशन च्या प्राप्त तक्रारी नुसार चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथिल अजीत सुकारे नामक व्यक्तीने तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक गावांत अवैध धंदे बाबत वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत तळोधी पत्रकार संघाने त्याबाबत बातम्या प्रकाशित केल्या होत्या.मात्र त्यानंतर सावरगाव येथिल एका " दैनिकाचे वार्ताहर भारत चुनारकर यांनी " चिमूर विधानसभेच्या " स्वयंघोषित " सामाजीक कार्यकर्त्यांला ठानेदाराचे निलबंन पाहिजे. की, अवैध व्यवसाय बंदी पाहिजे! या मथळ्याखाली वुत्त प्रकाशित केले होते.
या बातमी मुळे अजित सुकारे च्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी सरड पत्रकारांवर आरोप करणे व व्हाट्सअप या समाज माध्यमातुन शिविगाळ करून बदनामी करण्याचे षडयंत्र सुरु केले.सदर बाबतची तक्रार भारत चुनारकर यांनी तळोधी पोलीस स्टेशनला दिली होती.
नंतरही कुठलीही कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी तळोधी चे ठाणेदार राऊत यांचे मार्फत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन या स्वयघोषित सामाजिक कार्यकर्ता,अजीत सुकारे याचेवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती.अखेर तळोधी पोलीस स्टेशन येथे कलम 294,501,506, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागभिडचे ठाणेदार योगेश घारे करित आहेत.