व्हॅलिडिटी रद्द झाल्या नंतर ही पोलीस भरतीत दाखल - पोलीस अधीक्षकांनी निवड यादीतून वगळले.

व्हॅलिडिटी रद्द झाल्या नंतर ही पोलीस भरतीत दाखल - पोलीस अधीक्षकांनी निवड यादीतून वगळले.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : बोगस झाडे जातीची घुसखोरी प्रकरण जिल्ह्यात गाजत असून शैक्षणिक जात पडताळणी रद्द झाल्यानंतरही पोलीस भरतीत दाखल होत निवड यादीत आले परंतु आक्षेपानंतर पोलीस अधीक्षकांनी सहानिशा करून त्या बोगस उमेदवारांना निवड यादीतून काढले. त्यामुळे इतरही झाडे बोगस असल्याने तात्काळ व्हॅलिडिटी करण्याची मागणी होत आहे. व शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.


पोलीस भरती 2022 मध्ये भटक्या जमाती क प्रवर्गात झाडें जातीच्या दाखल्यावर भरतीत दाखल झाले. भरतीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड यादीत पालेश्वरी साईनाथ मुलकलवार, सचिन देवराव मादावार यांचे नाव आले.हे बोगस झाडें जातीचे उमेदवार असल्याचा आक्षेप धनगर संघटना व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी घेतला. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नियुक्ती आदेश न देता अगोदर व्हॅलिडिटी सादर करण्याच्या त्यांना आदेश दिले.


 त्यानुसार जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी पालेश्वरी मुलकलवार हिचे 23 सप्टेंबर 2020 व सचिन मादावार यांचे 23 जुलै 2019 ला जातीचे दाखले रद्द केले असल्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांना सादर केला. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी निवड यादीतून त्यांना वगळले आहे. त्यामुळे बोगस झाडें जातीच्या प्रमाणपत्रावर लाभ घेत असलेल्या उमेदवारांमध्ये खळबळ माजली आले.


व्हॅलिडिटी रद्द झाल्यानंतर जातीचे दाखले जात पडताळणी समितीने जप्त केले मात्र या दोन्ही उमेदवारांनी शकल लढवीत दुसरे बोगस झाडे जातीचे दाखले काढून शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुुळे त्यांचेवर फौजधारी गुन्हे दाखले करण्यात यावी. - डॉ.तुषार मर्लावार नागपूर विभाग अध्यक्ष,धनगर समाज संघर्ष समिती

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !