उमरी पोतदार ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकास १३ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ केले अटक.

उमरी पोतदार ग्रामपंचायत च्या ग्रामसेवकास १३ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ केले अटक.


एस.के.24 तास


पोंभुर्णा : योगा शेड बांधकामाचे देयक काढून देण्याच्या कामासाठी १३ हजार रुपयांची लाच घेताना उमरी पोतदार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. देवानंद मुरलीधर गेडाम असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.


कंत्राटदाराने पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार ग्रामपंचायत अंतर्गत गावात योगा शेडचे बांधकाम केले. या बांधकामाचे ३ लाख ४९ हजार ३२१ रूपये झाले होते. सर्वप्रथम ग्रामसेवक देवानंद गेडाम यांनी २ लाख ४० हजारांचे देयक काढून दिले.त्यानंतर उर्वरित देयक काढून देण्यासाठी ५ टक्के याप्रमाणे १७ हजार ५०० रुपये लाच मागितली.


कंत्राटदाराने त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.विभागाने सापळा रचून तड जोडीअंती १३ हजार रुपये स्वीकारतांना देवानंद गेडाम यास अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक,मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक,जितेंद्र गुरनुले यांच्या पथकाने केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !