राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वच्छता अभियान.

 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी स्वच्छता अभियान.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,०१/१०/२३ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात  नागरिकांनी आजच्या दिवशी एक तास स्वच्छतेसाठी देऊन आपला गाव आपले परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावावा यासाठी स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एक तारीख एक घंटा या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एन.सी.सी. विभागाच्या 3महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी. सी. च्या कॅडेट यांच्या वतीने ब्रहापुरी येथील रेल्वस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम  राबविण्यात आली .


त्याआधी  महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ देवेश कांबळे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण  करून अभिवादन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या परिसरात  वृक्षारोपण करण्यात आल्यानंतर एनसीसी विभागाच्या 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन. सी .सी .च्या कॅडेटस्नी  मुख्य रस्त्याने स्वच्छतेचा संदेश देणारी लोकजागृती करणारे नारे देत रॅली काढून ब्रहापुरी येथील रेल्वस्थानक परिसर स्वच्छ करून लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला.


सदर उपक्रम 3 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी.आणि महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉ.देवेश कांबळे यांच्या आदेशानुसार एन.सी.सी ऑफिसर लेफ्ट.सरोज शिंगाडे यांच्या मार्गदर्शनात स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमात  प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी  तसेच 75 कॅसेट्स उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !