समाज कार्यासाठी प्रबोधनकार,चेतन ठाकरे यांचा सत्कार.

समाज कार्यासाठी प्रबोधनकार,चेतन ठाकरे यांचा सत्कार.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


आरमोरी : ओम शिव शारदा मंडळ ताडूरवार नगर आरमोरी च्या वतीने शारदा उत्सवाच्या निमित्ताने प्रबोधनकार चेतन ठाकरे यांच्या समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मान.पवनजी नारनवरे, उद्घाटक पोलीस निरीक्षक मान.मंडलीक साहेब, प्रमुख अतिथी भा.ज.यु.मो.चे महामंत्री तथा नगरसेवक मान.भारतभाऊ बावनथडे आणि 

सत्कारमूर्ती प्रबोधनकार चेतन ठाकरे उपस्थित होते. चेतन ठाकरे यांनी आजतागायत शिक्षकी पेशा इमाने इतबारे सांभाळून फावल्या वेळात भारूड या लोककलेच्या माध्यमातून समाजातील वाईट चालीरिती,व्यसनाधीनता,अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ४७० च्या वर कार्यक्रम केले आहेत. या या माध्यमातून ते संत महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार तसेच भारतीय संस्कृतीला जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.सोबतच वृक्षारोपण,रक्तदान,ग्राम स्वच्छता अशा अनेक गोष्टींचे महत्व प्रभावीपणे लोकांना पटवून देत आहेत. सदर कार्यक्रमासाठी  ऐच्छिक मानधन न घेता केवळ जनजागृतीसाठी त्यांनी हे कार्य हाती घेतले आहे.


त्यांच्या याच कार्यासाठी मंडळाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की आई वडीलांचे संस्कार ,पत्नीचे सहकार्य, समाजसेवेची आवड आणि लोकांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळेच हे कार्य आपल्या हातून उत्साहात पार पडत आहे.आजन्म हे कार्य आपल्या हातून घडत राहो अशी सदिच्छाही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.

                

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान.ज्योतीताई खेवले यांनी केले.यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !