अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक जिल्हा परिषद शाळा वाचवा ; नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवा.


अखिल भारतीय सरपंच परिषद आक्रमक जिल्हा परिषद शाळा वाचवा ; नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवा.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


चंद्रपूर : जिल्हा परिषद शाळांनाचे खाजगीकरण समायोजन करण्याच्या नावाखाली कारस्थान व शासकीय नौकऱ्याचे कंत्राटीकरण धोरण विरुद्ध जिल्ह्यातील सरपंचानी तीव्र नाराजी व्यक्त करीत हे धोरण तात्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिला आहे.या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्रीच्या नावे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना दिले.


महाराष्ट्र मध्ये बेरोजगार मुला-मुलांची संख्या मोठया प्रमाणात असताना तसेच सरकारी कार्यलयामध्ये अनेक विभागात रिक्त पदे असताना सरकारी पदभरती न करता कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचारी नियुक्ती करणे हे अन्यायकारक आहे.नौकरी पद भरतीचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या आमदार खासदार तसेच राजकीय उच्चपदस्थ लोकांनची असण्याची पूर्णत : शक्यता आहे.या मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. 


त्यामुळे गुणवत्तेला डावलले जाईल.जि.प.शाळांचे खाजगीकरणं समायोजन करण्याच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे कारस्थान आणि शासकीय नौकऱ्याचे कंत्राटीकरणं हे धोरण बंद करावे.सर्व शाळांना भौतिक सुविधा आणि पर्याप्त शिक्षक पुरविण्यात यावे.शाळा दत्तक देण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे आदी मागण्या निवेदनद्वारे सरपंच यांनी केल्या आहे.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


निवेदन देताना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड देवा पाचभाई.जिल्हा अध्यक्ष,राजेंद्र कराळे सर.विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई. चंद्रपूर तालुका अध्यक्ष,अनिता पिदूरकर.सरपंच,संध्या पाटील सरपंच, नरुले सरपंच,चित्रा गनफाडे.सरपंच मंजुषा येरगुडे.सरपंच, पूजा मानकर यांच्यासह अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !