झाडीबोली साहित्य मंडळाचे यंदा झाडीबोली साहित्य संमेलन बामनी खडकी येथे.
एस.के.24 तास
साकोली : झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीचे ३१ वे - झाडीबोली साहित्य संमेलन बामनी (खडकी) ता. सडक (अर्जुनी), जि. गोंदिया येथे घेण्याचे निश्चित झाले असून सदर संमेलन दि. १६ व १७ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. झाडीबोली साहित्य संमेलनात दरवर्षी प्रमाणे यंदाही झाडीपट्टीचे साहित्यिक,कवी ,लेखक,लोक कलावंत मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. बामनी हे गाव सडक अर्जुनी पासून ६ किलोमीटर अंतरावर असून सौदंड (रेल्वे)पासून हे गाव ११ किलोमीटर अंतरावर आहे.
आयोजन समिती व स्थानिक मंडळींच्या पुढाकारांने दि. ५/१०/२०२३ रोजी बामनी येथे सभा घेण्यात आली.त्यात सर्वानुमते संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी - सरपंच विलासराव वट्टी यांची निवड करण्यात आली आहे.तर संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी चंद्रकांत बहेकार, सहकार्याध्यक्षपदी विलासराव शिवनकर, समन्वयकपदी नरेश भेंडारकर यांची निवड करण्यात आली आहे.या संमेलनात साहित्य प्रेमींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून सहकार्य करावे, असे आवाहन केंद्रीय समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.संमेलनाच्या दृष्टीने केंद्रीय समितीच्या सदस्यांची आभासी सभा होऊन त्यात हा निर्णय घेण्यात आला.
आयोजन समितीत निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर, आचार्य ना.गो.थुटे, एड. लखनसिंह कटरे, राम महाजन, अंजनाबाई खुणे,डॉ.गुरूप्रसाद पाखमोडे, डॉ. राजन जयस्वाल, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , डोमा कापगते महाराज, कवी मुरलीधर खोटेले आदींनी अभिनंदन केलेले आहे.लवकरच बामनी येथे नियोजन सभा आयोजित करण्यात येणार असून गाव परिसरातील जनतेत संमेलनाच्या दृष्टीने उत्साह संचारला आहे, हे विशेष.