तिरवंजा मोकासा येथील वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी.
संदेश चुनारकर !तालुका प्रतिनिधी!भद्रावती
भद्रावती : उपवनक्षेत्राअंतर्गत तिरवंजा मोकासा या परिसरात शेत शिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हल्ला करून जखमी केले. ही घटना शुक्रवार दुपारी 1.00.वा च्या सुमारास घडली. तिरवंजा मोकासा येथील युवा शेतकरी, युवा प्रज्वल ढवस हा 21 वर्षीय युवा शेतकरी हे नेहमी प्रमाणे आपल्या बैलांना चराई करिता आपल्याच शेत शिवारात घेऊन गेले होते.
तेव्हा त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने प्रज्वल ढवस यांच्या बैलावर हल्ला करून जागीच जखमी केले.त्या वेळेस ढवस यांच्यासह अनेक शेतकरी आजूबाजूच्या शेतात हजर होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने वाघाने तिथून धूम ठोकली. दरम्यान या घटनेची माहिती भद्रावती तिरवंजा मोकासा उपवन क्षेत्राचे अधिकारी यांना देण्यात आली. वन विभागाने घटनास्थळी गाठून पंचनामा केला. गेल्या काही दिवसापासून या भागात बिबट,वाघ,यांचा वावर आहे. तर काल सायंकाळी ठीक 7 ते 8 वाजता च्या सुमारास हाच वाघ तिरवंजा पडोली मुख्य मार्गावर फिरताना आढळला.
विशेष बाब म्हणजे तिरवंजा ते पडोली तसेच तिरवंजा WCL मार्गे दुर्गापूर या रस्त्यानि दररोज मोठं मोठ्या संख्येने WCL कर्मचारी वर्ग तसेच कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, शाळकरी विद्यार्थी, तर विवीध गावातील लोकांचे 24 तास येणे जाणे असते आणि यातच ही घटना पहिली नसून अश्या कित्येक घटना घडून गेल्या आहेत आणि आज जी घटना घडली.
ही तिरवंजा गावाच्या अगदी 500 मी अनंतराव घडली त्या मुळे उद्या कुना नाहक मनुष्याचा बडी जाऊ शकतो ही एकच भीती तिरवंजा ग्रामस्थ व लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्याची मागणी तिरवंजा मोकसा येथील नागरिक करीत आहेत.