चंदनवाही - कळमना रेल्वे भुयारी मार्गाच्या डांबरी करणाला सुरूवात.
★ उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते भूमिपूजन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : चंदनवाही - कळमना रेल्वे भुयारी पुलाच्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन कळमनाचे उपक्रमशील सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. चंदनवाही कळमना या मार्गावर रेल्वे चे भुयारी पुल आहे. या रेल्वे भुयारी पुलाचा रस्ता खुप खराब झाला होता त्याकरिता सरपंच नंदकिशोर वाढई यांनी ( IWO) बेललमपलली (SSC) इनचार्ज रेल्वे डिपार्टमेंट यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि प्रत्यक्ष डांबरीकरण कामाला सुरुवात झाली.यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे,पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे,तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई,माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे,गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते,विठ्ठल पाटील वाढई,आशिष ताजणे,शिपाई सुनील मेश्राम, विशाल नागोसे यासह मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.