होऊ द्या चर्चा..!
एस.के.24 तास
ब्रम्हपूरी : दिनांक,०६/१०/२३ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख मा.महेश केदारी साहेब,चंद्रपूर जिल्हा प्रमुख महिला आघाडी मा.नर्मदाताई बोरेकर,युवतीसेना प्रमुख प्रतिभाताई मांडवकर,चंद्रपूर ऊप जिल्हा प्रमुख ब्रम्हपूरी विधान सभा क्षेत्र प्रा.अमृतभाऊ नखाते,यांच्या उपस्थितीत मा.लिलाधरभाऊ गिरीधरराव चुधरी शिवसेना तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात सावली तालुक्यातील गेवरा बु.या गावात " होऊ द्या चर्चा " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केंद्र सरकार व राज्यातील मिंधे सरकारच्या बोल घेवड्या फसव्या योजनांचा भांडाफोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी सावली तालुका संघटक विकास महागमवार,युवासेना प्रमुख सागर शहा तसेच तालुक्यातील समस्त_ पदाधिकारी, शिवसैनिक,युवासैनिक परीसरातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.