रानटी हत्तींच्या कळपाची प्रथमच एन्ट्री ; इंजेवारी च्या जंगलातून प्रथमच पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश केला. ★ पीक कापणी च्या हंगामातच दहशत : तीन गावातील पीक तुडविले.

रानटी हत्तींच्या कळपाची प्रथमच एन्ट्री ; इंजेवारी च्या जंगलातून प्रथमच पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश केला.


पीक कापणी च्या हंगामातच दहशत : तीन गावातील पीक तुडविले.


एस.के.24 तास


पोर्ला : गेल्या दोन वर्षांपासून वडसा वनविभागात रानटी हत्तींचा धुडगूस सुरूच आहे. यातच रानटी हत्तीच्या कळपाने खोब्रागडी नदी ओलांडून चार दिवसांपूर्वी इंजेवारीच्या जंगलातून प्रथमच पोर्ला वनपरिक्षेत्रात प्रवेश केला.११ ऑक्टोबर रोजी हत्तींनी पोर्ला वनपरिक्षेत्रातील पोर्ला, नगरी व मोहझरी येथील शेतात धुडगूस घालून धान पीक तुडविले.ऐन हलके धान पीक कापणीचा हंगाम सुरू असतानाच हत्ती दाखल झाल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीसह चिंता आहे.


हत्तींनी तीन गावातील पिकांची नासधूस केल्यानंतर २१ च्या संख्येत असलेल्या कळपाने सायंकाळी देलोडा- पोर्ला मार्ग ओलांडला, याची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. सध्या हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे. मध्यम प्रतीचे धान निसवत आहे,तर जड़ प्रतीचे धान पंधरवड्यात निसवण्याची शक्यता आहे.


वन क्षेत्रातील गावे जंगलाला लागून असलेल्या गावात हत्तीची दहशत : - 


पोर्ला वनपरिक्षेत्रातील पोर्ला,नवरगाव, मोहझरी,वसा,बोडधा,वडधा,बोरी,सिसी आदी गावे जंगलाला लागून आहेत.येथील शेतकऱ्यांचे धान पीक नष्ट होण्याची शक्यता असल्याने वनविभागाने हत्तींना जंगलाच्या दिशेने वळवावे,तसेच कळपावर नियंत्रण ठेवावे,अशी मागणी शेतकरी,अरुण भैसारे नवरगाव करीत आहे.


पोर्ला वनपरिक्षेत्रात सध्या तीन गावातील धान पिकांची नासधूस रानटी हत्तींच्या कळपाने केली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.त्यांनी पंचनाम्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज सादर करावे. नुकसानग्रस्तांना १५ दिवसांत भरपाई दिली जाईल.तसेच हत्तींच्या कळपाला डिवचण्याचा प्रयत्न करू नये. हत्ती दिसल्यास वन कर्मचायांना वेळीच माहिती द्यावी. - राकेश मडावी,वनपरिक्षेत्र अधिकारी पोर्ला

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !