पोषण आहार आता बचत गट किंवा एखादी महिला कडे ; ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

पोषण आहार आता बचत गट किंवा एखादी महिला कडे ; ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना.


एस.के.24 तास


वर्धा : केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत अंगणवाडी केंद्रात सेविका व मदतनीस हे मानधनी कर्मचारी काम करतात.बालक व स्तनदा मातांना पूरक पोषण आहार देण्याची व अन्य जबाबदारी ते पार पाडतात.या शिवाय त्यांना कोणतीही कामे देवू नये,असे केंद्राचे निर्देश आहेत.आता ग्राम बाल विकास केंद्र सुरू होत आहे.त्यात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना आहे.


हे काम आता अन्य मार्गाने करण्याचा निर्णय अपेक्षित होता.त्या प्रमाणे अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविके कडून करण्यात येणारे अन्न शिजविण्याचे काम बंद करण्यात आले आहे.हे काम स्वयंपाकी नेमून किंवा महिला बचत गटा कडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.गावातील बचत गटा कडून निश्चित केलेला आहार तयार करून तो अंगणवाडी केंद्रात आणावा.या आहाराचे पर्यवेक्षण म्हणजे गरम व ताजा असण्याची दक्षता सेविका घेतील.घरी जावून जेवण करण्याची मुभा नाही.


अंगणवाडी केंद्रातील सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना अंडी किंवा केळी पुरविण्याचे काम पण बचत गटाकडे जाणार.त्यासाठी प्रती अंडी पाच रुपये गटास मिळेल.गावात बचत गट नसेल तर एखाद्या महिलेस हे काम देण्याची सूचना आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !