मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या वतीने ; भेंडाळा येथे पालकांचे शैक्षणिक जनजागृती कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : दिनांक : दिनांक,१९ऑक्टोबर २०२३ मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर व आकाश गेडाम सर तालुका निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील एकूण २३ गाव व २४ शाळांमध्ये "खेळाद्वारे शिक्षण/जिवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील जवळपास तीन वर्षां पासून राबविण्यात येत आहे.
मॅजिक बस नेमक काय काम करते हे पालकांन सोबतच गावातील नागरिकांना पण कडाव यासाठी पालकांसाठी व गावातील नागरिकांन साठी शैक्षणिक जनजागृती कार्यक्रम भेंडाळा या गावात घेण्यात आला. त्या मध्ये प्रत्येक्ष पालकांन सोबत खेळ खेळून त्यांना स्त्री-पुरुष समानता,पोषण आहार,शिक्षणाचे महत्त्व, गटकार्य,अभ्यास कोपराचे महत्त्व,बालकांचे अधिकार,कचरा व्यवस्थापन इ.विषयावर माहिती देऊन मॅजिक बसचा कार्यक्रम समजावून सांगण्यात आला. सोबतच सहभागी पालकांना बक्षीस स्वरूपात एक भेट वस्तू देण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार व गावातील समुदाय समन्वयक तेजस्वीनी तुंबडे,गावातील युथ सानिका भुरसे उपस्थित होते.