तब्बल २० विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत संधी देऊन इन्स्पायर करिअर अकॅडमी ने केली यशस्वी घोडदौड.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : स्थानिक इन्स्पायर करिअर अकॅडमी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्य अकॅडमी मधून सरकारी सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला होता. यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेऊन शासकीय सेवेत रुजू झालेले विद्यार्थी होते.
त्यात श्री.धीरज सुर्यवंशी(jr.ac.asst),श्री.सौरभ सूर्यवंशी(ITCP),श्री.महादेव प्रधान(SRPF),अक्षय वैरकर(BSF),शुभम सुरपाम(CRPF),अविनाश झोडे(police),अविश तुपकर(RAILWAY),महेश पिल्लारे(POLICE),तुषार ताजने(Data entry operator)अंकित लांजेवार(Railway) सचीन चिमलवार(Railway)मुकेश किनाके(Cifs) डिकेश्वर भाकरे(CIFS) आदर्श अमृतकर(SSB)प्रशांत गायधने (CIFS)शुभम राठी(BRO)कोमल म्हस्के(POLICE)
कु.अन्वेशा प्रदिप ढवळे व शृष्टी वसंत जणगणणावार(नवोदय विद्यालय) दर्श नरेश ठक्कर (शिष्यवृत्ती साठी पात्र) या कार्यक्रमाला अकॅडमी चे सर्व शिक्षक वृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने श्री मा. राहुलभाऊ लाखे वाहतूक नियंत्रक ब्रम्हपुरी ,निम्बोळ सर ब्रम्हपुरी इन्स्पायर अकॅडमीच्या संचालिका मा. सौ गुप्ता मॅडम तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मा. अनिलजी प्रधान सर तसेच सर्व यशवन्त विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमचि सुरुवात अकॅडमी च्या मुलींच्या सुरेल आवाजातील स्वागत गिताने झाली व् नंतर पहुन्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुण सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच या वर्षी 20 यशवंत विद्यार्थ्याचे सत्कार पुष्प गुच्छ ,ग्रामगिता व प्रशस्तिपत्र देऊन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.निकिता पीलारे हिने केले व् पाहून्यांचे परिचय श्री मा.विवेकजी खरवडे सर यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण प्रधान सर यांनी केले नंतर सरकारी सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यानी आपले मनोगत सादर करुण उपस्थित विद्यार्थाचे मनोबल वाढविले. नंतर मान्यवारांचे मार्गदर्शनाने विद्यार्थ्यना प्रोत्साहित केले श्री मा. निम्बोळ सर यानी आपल्या कठिन परिश्रमाचे दृश्य विद्यार्थ्या समोर मार्गदर्शनातून सादर करुण विधार्थी धर्म काय असते त्याना काय केले पाहिजे आई बाबांच्या कष्टांचि जाणीव कशी ठेवावी या विषयी मार्गदर्शन केले.
तर श्री मा. राहुलजी लाखे सर यानी पोलिस भरती ची योग्य तैयारी कशी करावी याविषयी सुचविले श्री मा. अनिलजी प्रधान सर यानी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुलानी अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल या विषयी सुचविले या नंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु,पूनम मैन्द हिने केल व कार्यक्रम हा उत्साहाने पार पडला.