" बौध्दिक संपदा " ही व्यक्तिविकास व देशोन्नतीसाठी आवश्यक.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,२५/१०/२३ " आज जगात बौध्दिक संपदेच्या जोरावर अमेरिकेतील बिल गेट्स सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या गेला.बौध्दिक संपदेचा वापर करुन अनेकांनी आपले पेटेंट तयार करुन अधिकार प्राप्त केले.वाड्मयाच्या क्षेत्रात आपले बुक काॅपीराईट करुन जगात पोहचता येते.वाणिज्य किंवा विज्ञान विभागात क्रांती करता येते,त्यामुळे " बोध्दिक संपदा " ही व्यक्तिविकास व देशोन्नतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य.डॉ.एन.एस.कोकोडेंनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ' बौध्दिक संपदे'वरील (आय.पी.आर) कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य.डॉ.डी.एच.गहाणे तर प्रमुख उपस्थितीत माजी उपप्राचार्य,डॉ.डी.ए.पारधी,डॉ सुभाष शेकोकर,डॉ राजेंद्र डांगे,डॉ रेखा मेश्राम,डॉ.किशोर नाकतोडे,डॉ युवराज मेश्राम उपस्थित होते.यावेळी प्राचार्य,डॉ.डी.एच.गहाणेंचा साठवा वाढदिवस केक कापून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.युवराज मेश्राम तर आभार डॉ. किशोर नाकतोडेंनी केले.यशस्वीतेसाठी समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.