आय.टी.आय.च्या प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांसाठी अंतिम संधी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत चौथी समुपदेशन फेरी सुरू झालेली असून नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी संस्थानिहाय व व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी उमेदवारानी व्यक्तिशः दि. १.१०. २३ ते १०.१०. २३ या दरम्यान संस्थेत उपस्थित राहून सर्व मूळ प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित करता येईल.
विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना ४ थ्या समुपदेशन फेरी साठी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करणे,प्रवेश अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश शुल्क भरणे,पूर्वीचे व आता भरलेले अर्ज निश्चित करणे हे दि.५.१०.२३ ते दि. ७.१०.२३ या दरम्यान करावयाचे आहे.
अशा नोंदणीकृत व अप्रवेशित उमेदवारांनी संस्थास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीसाठी व्यक्तिशः उमेदवारांने संस्थेत उपस्थित राहून मूळ प्रमाणपत्रांचे आधारे दिनांक ८.१०.२३ ते १०.१०.२३ या दरम्यान आपला प्रवेश निश्चित करावा व अखेरच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केले आहे.