स्वप्निल मेश्राम यांचा उपक्रमशील सरपंच नंदकिशोर वाढईंच्या हस्ते सत्कार.
★ आय.टी.क्षेत्रातील नामांकित एम.एन.सी.ऑफ इंडिया मध्ये मेश्राम यांची निवड.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : चंद्रपूर येथील रहिवाशी असलेल्या सामान्य भोई ढिवर कुटुंबातील स्वप्निल पुंडलिक मेक्षाम यांची आय. टी क्षेत्रातील नामांकित एम. एन. सी. आॅफ इंडिया मध्ये निवड झाल्याबद्दल कळमनाचे उपक्रमशील सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
सोबतच त्यांच्या आई वडिलांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री. वाढई यांनी सांगितले की स्वप्निल ने प्रचंड बुद्धिमत्तेच्या जोरावर हे यश संपादित केले. बहुजन समाजातील युवकांनी यापासून प्रेरणा घेऊन प्रगती करावी अशी भावना व्यक्त केली.या प्रसंगी समाजसेवक,कुषणाजी भोयर,भोई समाज विभागीय अध्यक्ष नागपूर सामाजिक कार्यकर्ता भोई ढिवर तालुका अध्यक्ष,बाळुभाऊ गोंदे बल्लारपूर,प्राचार्य डॉ.रवी केवट, महिला महाविद्यालय बल्लारपूर, पुंडलिक मेक्षाम, सचिन लखपती, जिजाबाई मेक्षाम, डिंपल मेक्षाम यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.