भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिन साजरा.

भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिन साजरा.   


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली येथे ‌दि.13/10/2023 ला जागतिक आपत्ती व्यवस्थापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत वर्ग 5 वी ते 8-वी करीता चित्रकला स्पर्धा आणि वर्ग 8 वी ते 10 वी करीता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षीका मा.डहाके मैडम तर प्रमुख अतिथी म्हणून मा.खांडरे सर,मा.पाचभाई सर,मा.बाला सर,कु.कोरडे मैडम आणि सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.


कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पुर परिस्थिती भूकंप, आग आणि इतर आपत्तीच्या वेळी कसे स्वत : चे आणि इतरांचे रक्षण करावे याविषयी पुरेपूर मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी,हरित सेना विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे संचालन श्री.चेतन ठाकरे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.बाला सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !