ब्रेकिंग न्युज...
अज्ञान वाहनाच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : सावली पासून अवघ्या दोन किलोमीटर असलेल्या असलेल्या बोरकर यांच्या गोडाऊन जवळ महाकाली चंद्रपूर येथून दर्शन घेऊन आष्टी येथील रहिवासी प्रमोद जयपुरकर रा.आष्टी तालुका चामोर्शी जि.गडचिरोली पत्नीला घेऊन आपल्या मोटर सायकल क्रमांक MH 33 U 3608 ने चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जात असताना दिनांक,19/10/2023 रोज गुरुवारला रात्री 9 : 45 वा.च्या सुमारास अज्ञान वाहनाने जबरदस्त धडक दिल्याने प्रमोद जयपूरकर वय,30 रा.आष्टी हे जागी ठार झाले.
असून त्यांची पत्नी प्रणाली प्रमोद जयपुरकर वय,22 वर्ष गंभीर आहे.अपघाताची माहिती करता सावली येथील सामाजिक कार्यकर्ते,अतुल लेनगुरे,आशिष कार्लेकर, रमजान सय्यद,साजिद शेख,व अरुण दहेलकर यांनी अपघात स्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले पुढील तपास ठाणेदार,आशिष बोरकर,पोलीस शिपाई निलेश राऊत,धीरज पिदुरकर करीत आहे.