रामाळा येथे धान कापणी ला गेलेल्या महिलेवर हल्ला करणारी वाघिण जेरबंद.

रामाळा येथे धान कापणी ला गेलेल्या महिलेवर हल्ला करणारी वाघिण जेरबंद.


एस.के.24 तास


आरमोरी : मौजा रामाळा येथील शेत शिवारात धान कापणीसाठी गेलेल्या महिलेवर हल्ला करुन तिचा बळी घेणाऱ्या टी - १३ वाघिणीला मौजा मुलुरचक येथे जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले.ताडोबा - अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रविकांत खोब्रागडे व नेमबाज अजय मराठे यांच्या चमूने ही कामगिरी केली. मानव-वन्यजीव संघर्षात आतापर्यंत ६० वाघांना त्यांनी जेरबंद केले.


वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचून कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले.अवघ्या तीन दिवसांत वाघिणीला जेरबंद करण्यात यश आले. या वाघिणीला गोरेवाडा बचाव केंद्रात आणण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वनसंरक्षक एस.रमेशकुमार यांच्यामार्गदर्शनात ही कारवाई पार पडली.यावेळी वडसा उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक वनसंरक्षक संदिप भारती, वनपरिक्षेत्र अधिकारी पवनकुमार जोंग, अविनाश मेश्राम, क्षेत्र सहाय्यक राजेंद्र कुंभोर, अजय उरकुडे आदी सहभागी होते.


तसेच वाघिणीला जेरबंद करणाऱ्या चमुमध्ये दिपेश टेंभूर्णे, योगेश लाकडे,गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे,निकेश शेंदे,मनान शेख तसेच गडचिरोली जलद बचाव पथकातील आशिष भोयर,अजय कुकडकर,मकसुद सय्यद,गुणवंत बावनथडे,पंकज फरकाडे,निखील बारसागडे व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !