नागाळा येथील महात्मा ज्योतिबा फुले पाणी वाटर संस्थेच्या माध्यमातून.
★ परिसरातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : नागाळा येथील महात्मा ज्योतिबा फुले संस्था,कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून लोकहिताची कामे केली जातात.
या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावे व येथील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ व्हावी याकरिता मौजा,फुलझरी तलावाची दुरुस्ती व नहराचे बांधकाम सण 2015 ते 16 या सत्रात करण्यात आलेली होती.
परंतु वर्षातच नहर बांधकाम टूट फूट झाल्याने थेतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी जात नव्हते. व शेतकऱ्यांची शेतीची खूप हानी होत होती. सदर बाब ही लक्षात घेता परिसरातील पाणी वाटप संस्थेच्या लक्षात येताच समितीने तात्काळ मीटिंग लावून दक्षता घेतली.
शंभर लोकांच्या सहभागातून अंदाजे 60000 किमतीचे नहर बांधकामाची दुरुस्ती व समोरील नहराची साफ सफाई मौजा,नागाडा येथील ग्रामस्थ एकत्र येऊन तलावाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले.या कामाचा मौजा, नागाळा येथील महात्मा ज्योतिबा फुले पाणी वाटर संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला.