लघु उद्योगशीलांचा सहृदयी सत्कार : जय दुर्गा मंडळ, गांधी चौक कुर्झा वार्डाचा उपक्रम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/१०/२३ येथील कुर्झा वार्ड,ब्रह्मपुरीच्या गांधी चौकातील जय दुर्गा मंडळातील पदाधिका-यांनी समाजातील लघु उद्योगशीलांचा सहृदयी सत्कार करण्याचा एक आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणला.वार्डातील वंचित पण आपल्या लघु उद्योगातून आपल्या कुटुंबाला ऊकार, आकार देणा-यांचा सार्वजनिक जाहिर सत्कार यानिमित्ताने करण्यात आला.
यात दहीदुधाचा व्यवसाय करुन आपल्या मुलांना मोठे करत समाजात एक आदर्श निर्माण करणा-या अनुसया सोपान बावनकुळे,शिलाताई श्रीराम टिकले,गायत्री गुरुदेव खेत्रें यांचा शाल, श्रीफळ व हार टाकून त्यांना गौरविण्यात आले.तसेच उच्चशिक्षित परंतु वार्डात भाजीपालेवाले अमिताभ बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले, स्वस्त आणि मस्त भाजीपाला पुरवठा करणारे किशोर कोसे,नर्सरी चालवून हुबेहूब नक्कल करणारे
आशिष माहोरे,सिजनेबल लघु उद्योग करणारे दिनेश कामथे आणि चायनीज खमंग पदार्थ टाॅलीवर विकणारे संघदत्त कांबळेंचा सत्कार अनुक्रमे प्रा.डाॅ धनराज खानोरकर, अशोक उराडे,विनोद दिवटे व गोकुल सहारेंनी शाल, श्रीफळ व हार घालून केला, यावेळी टाळयांचा प्रचंड पाऊस पडून उपस्थितांनी या कार्यक्रमाचे मोठे कौतुक केले.इतकेच नव्हे तर महिलांसाठी,सत्कारमूर्ती किशोर कोसेला बाॅलीवूडमधिल कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? यावर लक्की ड्रा घेण्यात आला.यात राधा रमेश विखार विजयी झाल्या आणि'माहेरच्या साडी'च्या मानकरी ठरल्या.
या कार्यक्रमाचे उत्तम संचालन व आभार मोहनिस उराडेंनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळातील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.