आकापूर येथील अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती साठी ; सावली चे तहसीलदार.परीक्षित पाटील ठरले देवदूत.
विजय नरचुलवार - विशेष प्रतिनिधी
मुल : सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक,04/10/2023 बुधवार ला गडचिरोली मुल महामार्गावरबआकापूर बस स्थानक समोर येथे अंदाजे सायंकाळी 7: 00 वा.च्या दरम्यान मुल येथील श्री,शालिराम नारायण चौखुंडे वय,56 वर्ष राहणार, मुल वॉर्ड नं,05 ता,मुल जिल्हा,चंद्रपूर आकापूर येथे बस स्थानक समोर दुचाकी क्र.MH-34 Q -1176 टीव्ही एस.मॅक्स 100 हे मुल मार्गे जात असताना दुचाकी ला मागे अडकवलेल्या पपई ची थैली एक साईडला होती ती दुचाकी च्या मागच्या चाकात अडकल्याने चक्का जाम झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.
मुल मार्गाने सावली चे तहसीलदार,परीक्षित पाटील हे जात असताना हा अपघात झाला असे दिसून आल्याचे दिसताच स्वतःची गाडी रस्त्याच्या कडेला लावून ते अपघात झालेल्या व्यक्तीची चौकशी करून माहिती पोलीस स्टेशन,मुल येथे कळविले पोलीस घटनास्थळी पोलीस कर्मचारी,यादव व मेश्राम यांनी पोहोचले.
मुल ते गडचिरोली मार्गे एस.के.24 तास चे विशेष प्रतिनिधी,विजय नरचुलवार हे येत असताना त्यांना हा अपघात दिसला ते तिथे थांबून रस्त्याच्या मधोमध अपघात होऊन पडलेल्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला ठेवून रुग्णवाहिका 108 वर कॉल केले असता जवळपास च्या ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने कळले.
अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यास उशीर होऊ नये म्हणून विजय नरचुलवार यांचे मावस भाऊ आकाश उगदे रा,व्याहाड खुर्द त्यांच्या स्वतःच्या कार नी ग्रामीण रुग्णालय मुल येथे नेण्यात आले.जखमी वरग्रामीण रुग्णालय,मुल येथे उपचार सुरू आहे.त्यांच्या परिवाराला फोन द्वारे कळविण्यात आले.
अपघात झालेल्या व्यक्तीला कोणी मदत करायला तयार नव्हते पण सावली चे तहसीलदार,परीक्षित पाटील व एस.के.24 तास चे विशेष प्रतिनिधी, विजय नरचुलवार हे खुप मोलाची मदत केली.सर्वत्र कौतुक केले जात आहे.