जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे उपोषण सुरू असल्याच्या संदर्भात ; धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली माजी मंत्री,शोभाताई फडणवीस यांची भेट.
एस.के.24 तास
मुल : दिनांक 12/10/2023 ळा मुल येथे धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन धनगर समाजा मधे झाडे कुनबी यांची होत घूसखोरी तसेच गडचिरोली येथे सुरु असलेल्या उपोषण बद्दल सविस्तर माहिती दिली.
या प्रकरणाची त्वरित दखल घेत मा.शोभाताई फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री मान.फडणवीस साहेब,मंत्री अतुल सावे साहेब, गडचिरोली चे जिल्हाधिकारी,संजय मीणा साहेब,जात पड़ताळनी विभागाचे अधिकारी यांचेशी फोनवरून चर्चा करुन त्वरित झाडे कुनबी समाजाची घूसखोरी थांबवून उपोषण कर्त्या मुलांना न्याय देण्यात यावा असे सक्त निर्देश अधिकारी ना दिले.
यावेळी धनगर समाज संघर्ष समितिचे नागपुर विभाग अध्यक्ष,डॉ.तुषार मर्लावार,नितेश मँकलवार,राजु कंचावार, विनोद नेरडवार व समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.