सरपंच संघटना सावली तालुका आक्रमक जिल्हा परिषद शाळा वाचवा.नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवा.

सरपंच संघटना सावली तालुका आक्रमक जिल्हा परिषद शाळा वाचवा.नोकऱ्यांचे खाजगीकरण थांबवा.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : जिल्हा परिषद शाळांनाचे खाजगीकरण समायोजन करण्याच्या नावाखाली कारस्थान व शासकीय नौकऱ्याचे कंत्राटीकरण धोरण विरुद्ध सावली तालुक्यातील सरपंचानी तीव्र नाराजी व्यक्त करीत हे धोरण तात्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा सरपंच संघटना सावली तालुका  दिला आहे.या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्रीच्या नावे तहसिल कार्यालय सावली तहसीलदार यांना दिले.


महाराष्ट्र मध्ये बेरोजगार मुला-मुलांची संख्या मोठया प्रमाणात असताना तसेच सरकारी कार्यलयामध्ये अनेक विभागात रिक्त पदे असताना सरकारी पदभरती न करता कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचारी नियुक्ती करणे हे अन्यायकारक आहे.नौकरी पद भरतीचे कंत्राट घेणाऱ्या कंपन्या आमदार खासदार तसेच राजकीय उच्चपदस्थ लोकांनची असण्याची पूर्णतः शक्यता आहे. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे गुणवत्तेला डावलले जाईल.जि.प.शाळांचे खाजगीकरणं समायोजन करण्याच्या नावाखाली शाळा बंद करण्याचे कारस्थान आणि शासकीय नौकऱ्याचे कंत्राटी करणं हे धोरण बंद करावे.


सर्व शाळांना भौतिक सुविधा आणि पर्याप्त शिक्षक पुरविण्यात यावे.शाळा दत्तक देण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावे आदी मागण्या निवेदनद्वारे सरपंच यांनी केल्या आहे.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


निवेदन देताना.सरपंच संघटना सावली तालुका अध्यक्ष, पुरुषोत्तम चुदरी सरपंच,जिबगांव सरपंच संघटना सावली सचिव,कविंद्र लाकडे सरपंच अंतरगांव,सौ, रेखाताई बानबले उपाध्यक्ष तथा सरपंच चिखली,किशोर कारडे सरपंच कडोली,विठ्ठल येगावार सरपंच चांदली बुज सौ, वर्षाताई गेडाम सरपंच जामबुज,भोजराज धारणे सरपंच बोरमाळा,सौ,गिताताई चौधरी सरपंच घोडेवाही, शुभांगीताई मडावी सरपंच सामदा बुज,उषाताई गेडाम सरपंच चकपिरजी, सुनिल पाल उपसरपंच उसेगांव,ओमप्रकाश ढोलणे उपसरपंच केरोडा,उष्टूजी पेंदोर सरपंच लोढोंली,


नरेश बाबनवाडे उपसरपंच कोंडेखल,पुंडलिक वाळके प्र.सरपंच साखरी,जितेंद्र सोनटक्के उपसरपंच डोनाळा,चेतन रामटेके उपसरपंच घोडेवाही,प्रितीताई गोहणे सरपंच हिरापूर,मुक्तेश्वर आभारे सरपंच गायडोंगरी यांच्या सह ईतर सरपंच उपसरपंच सरपंच संघटना सावली तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !