राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाहिली मौन श्रद्धांजली. ★ तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रणमोचन गावात विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाहिली मौन श्रद्धांजली.


तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून रणमोचन गावात विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचा समारोप.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१३/१०/२३ तालुक्यातील रणमोचन (नविन आबादी)गावात ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दि. ११ ऑक्टोबर रोज बुधवारला ठीक ४.५८ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन वाहण्यात आली. यावेळी भगव्या टोप्यांनी परिसर फुलून गेला होता.



गुरुदेव भक्तांनी राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली वाहिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विष्णूजी तोंडरे (मुख्याध्यापक) ज्ञानगंगा विद्यालय बेटाळा, डाँ. नवलजी मुळे अड्याळ टेकडी , दलित मित्र प्रा. डी.के.मेश्राम, माजी प्राचार्य बन्सोड सर, डाँ. गोकुलदास बालपांडे, सौ. सुरेखाताई बालपांडे, ननावरे बाबूसाहेब,ब्रह्मपुरी तालुका पत्रकार संघाचे सचिव गोवर्धन दोनाडकर, माजी सरपंच भारत मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम मेश्राम, सौ. अस्विनी दोनाडकर, लक्ष्मी दोनाडकर  अंगणवाडी सेविका, ह.भ.प. गुरूनूले महाराज कासवी, झुरमुरे सर. किरमिरे सर, शेडमाके सर .सौ. बालपांडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरानी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला .   


रात्री ठीक ९ वाजता  भव्य विदर्भस्तरीय  खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.भजन स्पर्धाच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोदभाऊ चिमूरकर माजी जी प सदस्य चंद्रपूर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराजभाऊ तिडके, सह उद्घाटक म्हणून डॉ.नितीन कोडवते,प्रा.डी.के.मेश्राम, सोमेश्वर उपासे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर,सरपंच निलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे,ग्रामपंचायत सदस्य संजय प्रधान, घनश्याम मेश्राम, अस्विनी दोनाडकर,कोमल मेश्राम, मंदाताई सहारे, योगेश पिलारे, पो.पा. अस्मिता पिलारे,माजी सरपंच मंगेश दोनाडकर,विनोद दोनाडकर पत्रकार,आदी मान्यवर उपस्थित होते. 


भजन स्पर्धा कार्यक्रमाची सर्वप्रथम दीप प्रजवलन करून सुरुवात करण्यात आली.विशेष म्हणजे गावातील पवन संगतसाहेब यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबाबद्दल आई-वडिलांसह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी रणमोचन येथील महिलानी भजन सादर केले व नंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सूत्रसंचालन पराग राऊत तर आभार गोवर्धन दोनाडकर यांनी केले.


भव्य विदर्भ स्तरीय खुली खंजरी भजन स्पर्धेत महीला, पुरूष भजन स्पर्धेत एकुन ३७ भजन मंडळानी सहभाग नोंदविला होता.या मध्ये पुरुष गटामध्ये २१ पुरूष भजन मंडळांनी सहभाग नोंदविला होता. तर १६ महीला भजन मंडळ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.


प्रथम पारितोषिक राष्ट्रसंत भजन मंडळ जूनोना, व्दितीय पारितोषिक आदर्श गुरुदेव भजन मंडळ निमगव्हाण, तृतीय पारितोषिक हर्षवर्धन भजन मंडळ वणी, चतुर्थ पारितोषीक अखिल भारतीय गुरुदेव भजन मंडळ हिरापुर, पाचवे पारितोषीक भद्रनाथ भजन मंडळ भद्रावती, सहावे गुरुदेव भजन मंडळ विहिरगाव, सातवे गुरुदेव भजन मंडळ अंतरगाव तसेच उत्कृष्ट तबला वादन केवळ बगमारे, उत्कृष्ट खंजरी वादन भद्रावती, उत्कृष्ट हार्मोनियम वादन पिंटू काळे, आणि उत्कृष्ट गायन अनिल ढोरे यांना नियोजित पारितोषिक प्रधान करण्यात आले.


 महीला भजन मंडळ गटामध्ये : - 


प्रथम जिजाऊ नेहरू महीला भजन मंडळ चंद्रपूर, व्दितीय क्रांतीज्योती महीला भजन चणाखा, तृतीय कोकणाई भजन महीला मंडळ कवठा, चतुर्थ गुरुबाबा महीला भजन मंडळ आवळगाव, पाचवे मंजुळामाता महीला भजन मंडळ शिवणी तसेच उत्कृष्ट तबला वादन सुयोग देवाळकर चणाखा, उत्कृष्ट हार्मोनियम वादन बाबा नक्षीने चंद्रपूर, उत्कृष्ट खंजरी वादन शिवनी महीला मंडळ, उत्कृष्ट गायीका अश्विनी मेश्राम बरडकिन्ही यांना नियोजित पारितोषिक प्रधान करण्यात आले.


या भव्य विदर्भ स्तरीय खुली भजन स्पर्धेत पुरुष महीला भजन मंडळानी सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली तसेच सर्व विजयी पुरुष,महीला भजन मंडळाचे  श्री गुरुदेव सेवा मंडळ रनमोचन(नवीन आबादी) यांनी अभिनंदन केले.तसेच पुढील वाटचाली सदिच्छा व्यक्त केली.


कार्य प्रशिक्षक म्हणून राजू ठाकूर,नरेंद्र खोब्रागडे सर ,गिरीधर दोनाडकर ब्रह्मपुरीबसुनिल नाकतोडे,यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.गुरुदेव सेवा मंडळ व  ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महोत्सव कमिटी तसेच महिला मंडळ रणमोचन (नवीन आबादी) सर्व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यप्रशिक्षक म्हणून राजू ठाकूर,नरेंद्र खोब्रागडे सर,गिरीधर दोनाडकर ब्रह्मपुरी,सुनिल नाकतोडे,यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.गुरुदेव सेवा मंडळ व  ब्रम्हलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महोत्सव कमिटी  तसेच महिला मंडळ रणमोचन (नवीन आबादी) सर्व गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !