आल्लापल्ली येथील उप-कार्यकारी अभियंता (वर्ग-२) नाव.विनोदकुमार नामदेवराव भोयर ला चलुचपत प्रतिबंधक विभाग ने केली अटक.

आल्लापल्ली येथील उप-कार्यकारी अभियंता (वर्ग-२) नाव.विनोदकुमार नामदेवराव भोयर ला चलुचपत प्रतिबंधक विभाग ने केली अटक.


एस.के.24 तास


आल्लापल्ली : महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मर्यादीत, आलापल्ली ता.अहेरी जिल्हा गडचिरोली येथील उप-कार्यकारी अभियंता (वर्ग-२) नाव.विनोदकुमार नामदेवराव भोयर,वय ४७ वर्षे यांना २० हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारल्या वरून एसीबी गडचिरोली च्या पथकाने आज दि. १७ ऑक्टोंबर २०२३ रोजी रंगेहाथ पकडले.


याबाबत सविस्तर वृत्त असे की,यातील तक्रारदार यांना त्यांचे घरगुती मीटर फॉल्टी असल्याचे कारण सांगून गैर अर्जदार भोयर, उप-कार्यकारी अभियंता,म.रा.वि.वि.कं मर्या,आलापल्ली यांनी अंदाजे २.२० लाख रुपये दंड भरावे लागेल, असे बोलून सदर दंडाची रक्कम कमी करून ७३,६९८/- रुपयांचा दंड केला व सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून गैरअर्जदार भोयर यांनी ४० हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली. तकारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तकार नोंदविली.


सदर दंडाची रक्कम कमी केल्याचा मोबदला म्हणून ४० हजार रुपये लाच रक्कमेची पंचसाक्षीदारा समक्ष सुस्पष्ट मागणी केली व आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करून स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने सदर रक्कमेतील पहीला टप्पा रुपये २० हजार लाच स्विकारताना रंगेहाथ मिळून आले.


यावरुन गैरअर्जदार यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, अहेरी येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून त्यांचे मौजा वरोरा, जिल्हा चंद्रपूर येथील निवासस्थानांची अँटी करप्शन ब्यूरो, चंद्रपूर टीमकडून झडती घेण्यात येत आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, अँन्टी करप्शन ब्युरो,नागपूर, सचिन कदम,अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले,पो.नि.शिवाजी राठोड,सुनील पेददीवार,नथ्थु धोटे,राजेश पदमगिरवार,किशोर ठाकुर,संदीप उडान सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली व बिक्रमजीत सरकार,गडचिरोली यांनी केलेली आहे.


लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा : -


शासकीय काम करताना जर कोणी पैशाची मागणी करत असेल पोलीस उपअधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो कार्यालय, गडचिरोली दुरध्वनी क्रमांक - ०७१२-२९५०२०, टोल फ्रि क्रमांक १०६४ असे आव्हान करण्यात आले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !