जुनगाव येथील शेतकऱ्याच्या कुटुंबाला काँग्रेस नेते संतोष रावत यांनी सांत्वन करून केली आर्थिक मदत.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : देवाडा - जुनगाव येथील शेतकरी ठुमदेव जयराम घोटेकर यांच्या घराला आग लागल्यामुळे आगीत जळून जवळपास लाखो रुपयांचे नुकसान झाले.देवाडा येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तात्काळ संतोष रावत यांच्या शी संपर्क केला.
लगेच नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, संतोष रावत यांनी परिवाराचे सांत्वन केले. व आर्थिक मदत दिली. संतोष रावत यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत संपर्क करून तात्काळ पंचनामा करावा व नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रशासकीय स्तरावरून मदत करावी अशी ही मागणी केली.
नुकसान ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत करताना काँग्रेसचे नेते संतोष रावत,माजी पंचायत समिती सदस्य,दशरथ वाकुडकर,युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे,माजी सरपंच,जालिंदर बांगरे,देवाडा उपसरपंच,हेमंत आरेकर,अतुल चुधरी,अशोक मंडोगडे तं.मु.अ.देवाडा, थवाजी घोटेकर,सौ.शामल बदन संचालक कृ.उ.बा.स.पोभुर्णा तसेच कांग्रेसचे कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते.