मुल येथील साहिल सुत्रपवार ठरला गोंडवाना विद्यापीठातून बासरी वादनात अव्वल.

 


मुल येथील साहिल सुत्रपवार ठरला गोंडवाना विद्यापीठातून बासरी वादनात अव्वल.



राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : तीन दिवसीय संपन्न झालेल्या आंतर महाविघालयीन सांस्कृतीक युवा महोत्सव " इंद्रधनुष्य - २०२३ " या स्पर्धेमध्ये  तानवादय शास्त्रीय संगीत मध्ये बासरी वादन करून मुल येथील साहिल सुत्रपवार हा गोंडवाना विद्यापिठातुन प्रथम क्रमांक पटकावून अव्वल ठरला आहे.त्याची थेट राज्यस्तरावर निवड झाली आहे. 


सदर स्पर्धा  विदयार्थी विकास विभागांतर्गत घेण्यात आल्या होत्या.साहिल हा मूल येथील कर्मविर महाविद्यालयाचा बि.ए.फायनलचा विद्यार्थी असून दैनिक युवा राष्ट्रदर्शन चे पत्रकार,धर्मेंद्र सूत्रपवार यांचा सुपुत्र आहे.लहानपणा पासूनच साहिलला कलेची आवड असून त्याने कुठलेही कलेचे प्रशिक्षण न घेता बासरी वादनात हातखंडा प्राप्त  केला आहे. विशेष म्हणजे तो स्वःता घरी बासरी तयार करून स्पर्धेत वाजवीतो.


बासरी वादनाच्या  अनेक स्पर्धा त्याने गाजविल्या आहेत. आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्या नंतर सिनेस्टार सौरभ मेश्राम,मुंबई यांच्या हस्ते साहिलला पुष्पगुच्छ,पदक,प्रमाणपत्र देउन गौरविण्यात आले.यावेळी विद्यार्थी विकास प्रमुख प्रिया गेडाम,राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्याम खंडाळे श्री,देवाजी तोफा जेष्ठ समाजसेवक लेखा मेंढा,तसेच विघापिठातील सर्व विदयार्थी व  विधार्थीनी उपस्थित होते.


विदयापिठातून अव्वल ठरल्यानंतर विद्यापीठ, कर्मवीर महा,गावकरी व एस.के.24 तास न्युज नेटवर्क परिवार, मित्र मंडळी तर्फे त्याचे अभिनंदन होत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !