चांदापुर येथील शेत शिवारात १४ फुट लांब व २६ किलो वजन अजगर निघाला.
एस.के.24 तास
मुल : एक मोठे अजगर निघल्याने शेतकरी चांगलाच घाबरून गेला. मात्र,प्रसंगावधान राखून शेतकऱ्याने सर्पमित्राला बोलावून घेतले.सर्प मित्राने अजगरास पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.
ही घटना चांदापुर येथील लोकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली.संजीवन पर्यावरण संस्थेचे जाबाज सदस्य,दिनेश खेवले आणि तन्मयसिंह झिरे यांनी चांदापुर येथे जाऊन शेत शिवारातील १४ फुट लांब व २६ किलो वजना च्या अजगर सापाला पकडून आणले.
आज त्या अजगराला बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. अजगर सापाला सोडतांना वनरक्षक,सूधीर ठाकुर, वनरक्षक,पवन कुळमेथे,वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य,तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले,अंकुश वाणी,प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.