जांब रयतवारी येथील शेतकऱ्याचा तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने मृत्यू.

जांब रयतवारी येथील शेतकऱ्याचा तुटलेल्या ताराच्या स्पर्शाने मृत्यू.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : सावली तालुक्यातील जांब रयतवारी येथील शेतकरी,प्रकाश महादेव कोहळे वय,45 वर्ष यांचे आज सकाळी,7:00 वा.शेती पाहणी करण्याकरिता गेले असता, खांबाच्या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने करंट लागून त्याचे निधन झाले. 


सदर शेतकरी नेहमी प्रमाने सकाळी उठून शेतीची पाहणी करण्या करिता शेताकडे गेले. परंतु बराच काळ लोटूनही घरी न परतल्याने घरच्यांनी शेताकडे धाव घेतली असता शेतकरी प्रकाश कोहळे हे नाल्याजवळ मृतावस्थेत आढळून आले.


सदर घटना ही महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे घडल्याची लोकांत चर्चा आहे. महावितरणने वेळोवेळी खांबावर आलेल्या झाडांची छाटणी केली असती तर आज या शेतकऱ्याला जीव गमवावा लागला नसता. महावितरणच्या चुकीमुळे घरचा कर्ता जीव गमावल्याने परिवाराची खूप मोठी हानी झालेली आहे.करीत महावितर ने जास्तीत जास्त आर्थिक मदत कुटुंबियांना देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !