वरोऱ्यात शिवाजी मोघे यांचे निषेधार्थ माना जमातीचा भव्य मोर्चा.

वरोऱ्यात शिवाजी मोघे यांचे निषेधार्थ माना जमातीचा भव्य मोर्चा.


एस.के.24 तास


वरोरा : वरोरा येथे आज दिनाक  १/१०/२०२३ रोजी माना जमातीचे वतीने माजी मंत्री व काँग्रेसच्या आदिवासी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी मोघे यांनी केलेल्या असंविधानिक वक्तव्याविरोधात माना जमातीच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. 

सविस्तर वृत्त असे की,माना जमात प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून माना ही स्वतंत्र आदिवासी जमात असून तिची स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक १८ वर आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगांनी माना जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले आहे. मात्र नागपूर येथील आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस निमित्य जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री  शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत  " हमारी सरकार आयी तो हायर पॉवर कमिशन नेमो.


 उसमे गलतीसे जो जो जातीया आयी उसमे जो गलतीसे एन्ट्री आयी है उसमे माना भी है. यह माना भी गलत है यह गोंड माना उसके लिये है. सब माना के लिए नही है यह गलत है इसको निकाल डालो."अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे . त्यांचे हे विधान केवळ द्वेष भावनेतून करून संपूर्ण माना जमातीचा अवमान केला, जमाती जमातीत तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली. यावक्तव्यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी माना जमातीने आज दिनाक १ / १० /२०२३ रोजी दुपारी १२ वाजता उपविभागीय कार्यालय वरोरा येथे भव्य निषेध मोर्चा काढला. 


सदर मोर्चा डॉ.अब्दुल कलाम चौक ते उपविभागीय कार्यालय या मार्गाने काढून मोघे यांच्या विरोधात घोषणाबाजी व निदर्शने करून निषेध व्यक्त केला. नागपूर येथील जाहीर कार्यक्रमात माना जमातीचे विरोधात शिवाजी मोघे यांनी चुकीचे वक्तव्य केले त्यावेळी विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी हे नेते सुद्धा उपस्थित होते. यादोन्ही नेत्यांचे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात माना जमातीचे वास्तव्य असून त्यांनीही चुकीच्या वक्तव्याचा विरोध केला नाही याबाबतही जाहीर नाराजी व्यक्त केली. 


त्यावेळी वरोरा व भद्रावती तालुक्यातील  गावा गावातील माना जमातीचे विद्यार्थी, महिला व पुरुष, लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. निवेदन देण्यापूर्वी उपस्थिताना आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना महाराष्ट्र, तालुका शाखा वरोरा,आदिम माना जमात मंडळ मुबई, शाखा वरोरा  वरोरा तालुका माना जमात विकास संस्था,वरोरा यांचे प्रतिनिधीचे भाषणे झाली.त्यानंतर प्रतिनिधी शिष्ठमंडळानी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन शिवाजी मोघे माजी मंत्री यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी केली. 


भविष्यात माना जमातीचे विरोधी असे वक्तव्य केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र लढा देईल यासाठी शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला 


                                                                                         


                                                                                                          

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !