विद्युत प्रवाहाला हत्तीचा स्पर्श होवून मृत्यू झालेल्या शेतकरी बापलेक ताब्यात.

विद्युत प्रवाहाला हत्तीचा स्पर्श होवून मृत्यू झालेल्या शेतकरी बापलेक ताब्यात.


एस.के.24 तास


सिंदेवाही : वन्यजीव सप्ताह सुरू असतानाच वाघिणी पाठोपाठ एका रानटी नर हत्तीचा जिवंत वीज प्रवाहाला स्पर्श होऊन मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वनविभागाने वनगुन्हा दाखल करून अशोक पांडूरंग बोरकर वय,६५ अजय अशोक बोरकर वय,२९, रा.चिटकी या दोन्ही शेतकरी बापलेकांना ताब्यात घेतले आहे.सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र लोनखोरी अंतर्गत येत असलेल्या चिटकी येथील कक्ष क्रमांक २४७ च्या सीमेवर असलेल्या शेतशिवारामध्ये मंगळवारी सकाळी ७ वाजता जंगली नर हत्ती मृतावस्थेत आढळून आला.


घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला.पंचनामा झाल्यानंतर ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे डॉ.सुरपाम,डॉ.शालिनी लोंढे यांनी शवविच्छेदन केले.मुख्य वनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगांवकर,ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक दिपेश मल्होत्रा, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, विवेक करंबेकर, कायरकर यांच्या उपस्थितीत हत्तीचे दंत दहन तर उर्वरित अवयव दफन करण्यात आले. 


शेतामध्ये सोडलेल्या विद्युत प्रवाहाला हत्तीचा स्पर्श होवून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने अशोक पांडूरंग बोरकर, अजय अशोक बोरकर या दोन्ही बापलेकांना वनविभागाने गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.


जंगली जनावरांन मुळे शेतकरी त्रस्त.


आसाम येथील हत्ती छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले. येथून हे हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील सावली,सिंदेवाही, ब्रम्हपुरी व नागभीड तालुक्यात धुमाकूळ घालत आहे. रात्री बेरात्री तर कधी दिवसा हत्तीचा कळप शेतात प्रवेश करून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !